सांजवार्ता ऑनलाईन   Mar 14, 2020
                
                 
                औरंगाबाद : कोरोना व्हायरसच्या  धास्तीने आता लोक प्रवास  ही टाळताहेत. सहवासातून हा आजार होतो अशी भावना लोकांची असल्याने  लांब पल्ल्याचा प्रवास करता काळजी घेण्यात येत आहे. औरंगाबाद ऐतिहासिक  असताना शहराच्या आजूबाजूस अनेक औद्योगिक वसाहती तर  शहरात नामांकित शैक्षणिक  संस्था आहे. दरवर्षी  उन्हाळ्याच्या सुट्टीत या  शाळा मार्फत सहली  काढल्या जातात. मात्र या  वर्षी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने अनेक शैक्षणिक  संस्थांनी विद्यार्थ्यांच्या सहली रद्द केल्या. अनेक सहली रद्द  झाल्याने मात्र एसटी  महामंडळाला याचा आर्थिक  फटका बसणार आहे. या  संदर्भात औरंगाबाद सेंट्रल  डेपोचे  मॅनेजर सुनील शिंदे  यांनी या महिन्यात  दोन  सहली  होत्या त्या पूर्ण  झाल्या असल्या तरी सध्या एकही बुकिंग नसल्याचे  सांगितले. पाचवी ते दहावी  पर्यंत शाळांच्या परीक्षा संपल्या नंतर दरवर्षी  ऐतिहासिक व पर्यटन  स्थळांना भेट देतात. शैक्षणिक संस्थांचे  जबाबदार विध्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या द्दष्टीने महामंडळाच्या बसेसने  महामंडळाच्याप्रवास  करणे  पसंद  करतात. सूत्रांच्या  माहितीनुसार  राज्यभरातील  खास  शिवशाही  सीटिंग  व  शिवशाही स्लीपर बस मधून  प्रवास करणार्या प्रवाशांंच्या   संख्येत मोठी घट झाली  आहे.  औरंगाबाद  शहरातून  मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, बोरिवली  व कोल्हापूर साठी  शिवशाही बसेस धावतात. गेल्या आठ  दिवसात या  लांब पल्य्याच्या गाड्या  खाली जात असल्याची  माहिती  समोर आली आहे. पुणे  व नाशिकला प्रत्येक  अर्ध्य  तासाला शिवशाही  असतं मात्र प्रवासी नसल्याने  अनेक गाड्या रद्द कराव्या  लागत असल्याचे डेपो  मॅनेजर सुनील शिंदे यांनी  सांगितले. त्याच  बरोबर  लाल  परिवर्तन  बसेस ही खाली  जात असल्याने  महामंडळाचा आर्थिक  नुकसान वाढत आहे. ग्रामीण  भागातील  बसेस  वर  जास्त  परिणाम  झाल्याचे  दिसत  नाही.